top of page
logo.jpg.jpeg
Gemini_Generated_Image_wwxud5wwxud5wwxu.png
विद्यादेवी नमितो तुजला I दे ना आम्हा विद्या तू II
सुगंध देऊ या जगताला I ​प्रसन्न हो गे आम्हा तू  II

 

कै.मा.श्रीमती विमलाताई कर्वेबाई

संस्थापिका  व विश्वस्त

टिळकसर.jpeg

 

मन:पूर्वक अभिनंदन 

 

सरस्वती मंदिर ट्रस्ट 'वेब' साईटच्या माध्यमातून आपणा सर्वांशी संपर्क साधताना मनापासून आनंद होत आहे.  आधुनिक संपर्क माध्यमाचा प्रभावी वापर परस्परांना प्रगतीचा मागोवा घेण्यास तसेच नवनवीन तसेच नवनवीन कल्पना / विचारांच्या आदान-प्रदानास उपयुक्त ठरेल या विश्वासासह  सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

​श्री. अशोक टिळक 

  गौरवशाली ७५ वर्षे

दि. ६ जून १९५२ रोजी सरस्वती मंदिर प्राथमिक शाळेची स्थापना झाल्यापासून  ही शाळा पुढे टप्प्याटप्प्याने वाढत गेली.

१९६६ मध्ये शाळा स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाली आणि ‘सरस्वती सेकंडरी स्कूल’ सुरू झाले. कर्वे बाई व पुढे टिळक सर यांच्या नेतृत्वाखाली शाळेने मोठी प्रगती करत आज वटवृक्षाचे रूप घेतले आहे, ज्यातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वी झाले आहेत.

गेल्या काही दशकांत संस्थेने इंग्रजी माध्यम, क्रीडा, विज्ञान, कला, भाषा संलग्न अशा विविध उपक्रमांची सुरुवात केली आहे. वाढत्या गरजांनुसार नवीन इमारतीही उभारण्यात आल्या आहेत.

अमृत महोत्सवी वर्षात ‘स्नेह, संवाद आणि सन्मान’ या मूल्यांवर आधारित सर्वांगीण, सक्षम व आधुनिक शिक्षण देणारे विद्या संकुल उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

सुरेन्द्र दिघे 

​कार्यकारी विश्वस्त - सरस्वती मंदिर ट्रस्ट 

Mr.Surendra Dighe [ Managing Trustee]

मागे वळून पाहताना

आपले सहकार्य शाळेची खरी ताकद आहे.

माजी विद्यार्थी समूहात सामील व्हा आणि शाळेशी नातं अधिक दृढ करा.

माजी विद्यार्थी, आमचा अभिमान 

माजी विद्यार्थी हे संस्थेचा अमूल्य ठेवा आहे.  शाळेने दिलेले संस्कार, शिक्षण आणि मूल्ये आज विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांमधून दिसून येतात. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर आजी विद्यार्थ्यांना, करिअरच्या संधी, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा मिळू शकते. अशा सशक्त माजी विद्यार्थी समूहामुळे शाळेचा वारसा अधिक दृढ होईल आणि संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल. संस्थेच्या  उज्ज्वल भविष्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी  संस्थेशी सदैव जोडले रहावे, हीच अपेक्षा.

​अमृत महोत्सवी वर्ष २०२६-२०२७
दि. ६ जून २०२६ अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाची क्षणचित्रे 

bottom of page